Sindhudurg Tourism in Marathi | सिंधुदुर्ग पर्यटन

"सिंधुदुर्ग पर्यटन"


           
सिंधुदुर्ग पर्यटन (महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे) sindhudurg killa


विविधता आणि समृद्धीचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतात महाराष्ट्र राज्यातील एक पर्यटन जिल्हा म्हणून 'सिंधुदुर्ग' जिल्ह्याचा विकास होत आहे. महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रांतातील हा जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किमी ची किनारपट्टी लाभलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक चौपाटी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. या चौपाटी अतिशय स्वच्छ प्रदूषण विरहित शांत अशा असल्यामुळे परदेशी व व भारतीय पर्यटकांचा यांच्याकडे ओढा आहे.
           सिंधुदुर्ग जिल्हा मुंबईपासून सुमारे ५०० कि.मी. दूर आहे मुंबईवरून सिंधुदुर्ग येण्यासाठी विमान सेवा आहे. याचे तिकीट सुमारे ₹२५००/ पासून पुढे उपलब्ध आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग रेल्वे मार्गाने देखील येता येते. याचे तिकीट ₹२५०/ पासून पुढे सुरू आहे. काही रेल्वे गाड्यांना पर्यटकांसाठी विशेष विस्टा डोम कोच लावण्यात आलेले आहेत. तसेच मुंबई ते सिंधुदुर्ग व्हाया पुणे दूतग्रती महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, मुंबई गोवा सागरी महामार्ग आहे. मुंबई ते गोवा जहाज सेवा आहे याचे तिकीट ₹२५०००/ पासुन उपलब्ध आहेत  हे पर्याय उपलब्ध आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला शिवलंका सिंधुदुर्ग व विजयदुर्ग तसेच किनार पट्टीचे रक्षणासाठी अनेक छोटे बुरुज गढी येथे आहेत.या पुढच्या भागांमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपाटी, खाद्यसंस्कृती, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक मंदिरे, पर्यटन याविषयी पाहणार आहोत.


सिंधुदुर्ग पर्यटन (महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे) sindhudurg killa



You can see information about Sindhudurg district here  
https://kauexplore.kaujourneys.com/2022/10/sindhudurg-tourism.html