Mumbai to statue of unity, Garudeshwar in Marathi | मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी,गरुडेश्वर

Mumbai to statue of unity, Garudeshwar in Marathi - मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी,गरुडेश्वर

गरुडेश्वर, स्टॅच्यू ऑफ युनिटी सहल 

               शुक्रवारी रात्री मुंबईतील दादर स्टेशन वरून दादर एकता नगर एक्सप्रेस १२९२७ आहे. त्याचे स्लीपर चे तिकीट ₹३१०/ व थ्री टीयर एसी  ₹७४०/  आहे. आठवड्यातील सातही दिवस ही ट्रेन दादर ते एकता नगर चालते. दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी ७:३० ला गुजरात मधील एकता नगरला पोहोचते. 
                एकता नगर रेल्वे स्टेशनला उतरल्यावर तिथून टॅक्सीने गरुडेश्वर ला जाता येते टॅक्सी ₹२००/ घेते सहा व्यक्तींसाठी गरुडेश्वरला पोहोचल्यावर तेथे भक्त निवास उपलब्ध आहेत ₹६०० ते ७०० पर्यंत आपणास रूम मिळते. रूमवर जाऊन फ्रेश झाल्यानंतर नर्मदा घाटावर देखील स्नान करू शकतो. नंतर श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन  घेऊन झाल्यानंतर वरती श्री दत्त मंदिरात दर्शन घ्यावे. नंतर बाहेर येऊन गरुडेश्वर दत्त संस्थान येथून दुपारच्या प्रसादाची कुपन घ्यावीत ही कूपन सकाळी ००:०९ ते १०:०० व संध्याकाळी ००:०५ ते ००:०६ या वेळेत संस्थानाच्या कार्यालयात मिळतात ₹५०/ प्रति व्यक्ती संस्थाना मार्फत उत्तम प्रसादाची सोय करण्यात येते.

श्री गरुडेश्वर दत्त मंदिर याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.  
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_11.html


Mumbai to statue of unity, Garudeshwar in Marathi - मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी,गरुडेश्वर

  
                   दुपारी प्रसाद झाल्यावर टॅक्सीने श्री कुबेर भंडारी धामचे दर्शन घ्यावे तेथून निळकंठ धाम (स्वामीनारायण मंदिर) पोईचा येथे जाऊन दर्शन घ्यावे.  उत्तम असे विशाल मंदिर आपणास पहावयास मिळते येथे सर्व मंदिर फिरून झाल्यानंतर खाण्यासाठी माफक दरात उत्तम असे उपहारगृह संस्थांना तर्फे चालवण्यात येते. तिथून शुलपाणेश्वर मंदिर दर्शन घेता येते तिथे रात्री ०८:०० वाजता नर्मदा घाटावर नर्मदा मातेची आरती होते, आरती झाल्यावर गरुडेश्वर येथे येऊन महाप्रसाद घ्यावा. या ३ ठिकाणी  जाऊन येण्यासाठी टॅक्सी ₹२५००/ घेते सहा व्यक्तींसाठी.

Mumbai to statue of unity, Garudeshwar in Marathi - मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी,गरुडेश्वर

                          दुसऱ्या दिवशी सकाळी स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी निघावे. एकता नगर स्टेशन जवळ काही हॉटेल्स आहेत. तिथे नाश्ता करावा एकता नगर स्टेशन वरून स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये जाण्यासाठी मोफत बसेस उपलब्ध आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये प्रवेश केल्यानंतर श्रेष्ठ भारत भवन येथून मुख्य पुतळ्याकडे जाण्यासाठी बसेस आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये मुख्य स्टॅच्यू परिसर, व्हिविंग गॅलरी, व मुख्य पुतळ्याच्या छातीकडील भागांमधून खाली दिसणारा परिसर इत्यादी गोष्टी पाहण्यासाठी ₹३८०/ तिकीट आहे. प्रत्येक पर्यटकास दोन तासाची वेळ उपलब्ध असते पुतळ्या मधून वरती जाण्यासाठी लिफ्ट उपलब्ध आहे. मुख्य पुतळ्याच्या छाती मधील भागातून आपण खालचे विहंगम दृश्य पाहू शकतो. तसेच खालील विस्तीर्ण परिसरात आपण फिरु शकतो. त्यानंतर खालील पर्यटन स्थळे पहावीत.

श्री दत्त मंदिर माणगाव याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2024/01/shree-datta-mandir-mangaon-in-marathi.html



Mumbai to statue of unity, Garudeshwar in Marathi - मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी,गरुडेश्वर



सरदार सरोवर डॅम 
जंगल सफारी 
बटरफ्लाय गार्डन 
विश्व वन 
पेट झोन 
आरोग्यवन 
ग्लो गार्डन 
सरदार सरोवर नौका विहार बोटिंग 
माझे गार्डन 
भुलभुलय्या 
इलेक्ट्रिक स्कूटर टूर 


Mumbai to statue of unity, Garudeshwar in Marathi - मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी,गरुडेश्वर


                   संध्याकाळपर्यंत ही सर्व ठिकाणी पाहून झाल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसर व हेलिपॅड गार्डन येथून आपण मुख्य पुतळ्यावरील प्रोजेक्शन मॅपिंग पाहू शकतो हा शो दररोज रात्री ०७:०० वाजता सुरू होतो. रात्री ०९:२५ वाजता एकता नगर वरून मुंबईसाठी रेल्वे आहे.

दर सोमवारी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा परिसर व सर्व ठिकाणी पर्यटकांसाठी बंद असतात.

एकता नगर रेल्वे स्टेशन ते गरुडेश्वर ५ कि. मी. 
एकता नगर रेल्वे स्टेशन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी ७ कि.मी. 
गरुडेश्वर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी १२ कि.मी.
स्टॅच्यू ऑफ युनिटी ते निळकंठ धाम ४० कि.मी. 
निळकंठ धाम ते कुबेर भंडारी १६ कि.मी.

श्रीक्षेत्र कुमसी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता. 
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_20.html