Garudeshwar Datta Mandir in Marathi | श्री गरुडेश्वर दत्त मंदिर

Garudeshwar Datta Mandir in Marathi - श्री गरुडेश्वर दत्त मंदिर

प्राप्त होण्या स्वस्वरूपासी |
निघावे आता परीयेसी |
प्रकट बोलें हेचि स्वभावेसी |
गुप्तरुपे राहूं येथे |
स्थान अपुले गरुडेश्वरी |
येथून न वचे निर्धारी |
लौकिक मते अवधारी |
बोल करीतो श्री स्वरूपयात्रेचा ||
प्रकट करूनी श्री स्वरूपयात्रेसी |
वास निरंतर श्रीक्षेत्र गरुडेश्वरासी |
भक्तजन तारावयासी | 
राहू येथे निर्धार || 


                  श्री क्षेत्र गरुडेश्वर हे ठिकाण पूर्वीच्या राजपीपला या संस्थानात येत असे. अखंड हिंदुस्थानात सन्यस्त धर्माचे कठोर आचरण करणारे श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांनी २३ वा चातुर्मास शके (१८३५-३६) इ. स. १९१३-१४ जेथे केला ते हे पवित्र तीर्थक्षेत्र.

                      पूर्वी गरुडेश्वर गाव नव्हते, स्वामी महाराजांच्या १४ महिने वास्तव्यामुळे येथे हळूहळू गाव निर्माण झाले व आज एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ते प्रसिद्ध आहे. येथेच श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराजांनी समाधी घेतली. या ठिकाणी नर्मदामैया पश्चिम वहिनी वाहते. नर्मदा मातेच्या दोन्ही अंगाला ८० मैल पर्यंत श्रीशुलपाणीश्वराचे जंगल आहे.

                श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे जाण्यासाठी मुंबईवरून एकता नगर रेल्वे आहे एकता नगर येथे उतरल्यानंतर टॅक्सीनी आपण गरुडेश्वर दत्त मंदिर येथे जाऊ शकतो श्रीक्षेत्र गरुडेश्वर दत्त देवस्थान यांच्यामार्फत राहण्याची उत्तम सोय केली जाते. ₹६०० ते ७०० पर्यंत आपणास रूम मिळते.


श्री दत्त मंदिर माणगाव याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2024/01/shree-datta-mandir-mangaon-in-marathi.html


Garudeshwar Datta Mandir in Marathi - श्री गरुडेश्वर दत्त मंदिर


         श्री दत्त मंदिर मध्ये आपणास श्रीमत् वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज यांच्याशी संवाद साधणारी (कागल येथील) दत्तमूर्ती पहावयास मिळते. ही मूर्ती सिद्धासन घातलेली असून सात बोटे उंचीची द्विभुज व वराभयकर पितळेची आहे. स्वामी महाराजांनी स्वतः ही मूर्ती तयार करून घेतलेली आहे.

 

Garudeshwar Datta Mandir in Marathi - श्री गरुडेश्वर दत्त मंदिर


            त्याच्या शेजारी श्री विठ्ठलराव सोनार यांनी दिलेली पंचधातूची दत्त मूर्ती पहावयास मिळते. श्रीआदि शंकराचार्य (डावीकडे) श्री दत्तात्रेय (मध्ये) व श्री सरस्वती देवी (उजवीकडे) अशा तीन मूर्ती महाराजांनी स्थापन केल्या आहेत. मंदिरात गुरुवारी पालखी सोहळा होतो. 


श्रीक्षेत्र कुमसी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता. 
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_20.html


Garudeshwar Datta Mandir in Marathi - श्री गरुडेश्वर दत्त मंदिर

    

             दत्त मंदिराच्या उजव्या बाजूस नर्मदा नदीच्या तीरावर काही अंतर उतरल्यावर आपणास स्वामी महाराजांचे समाधी मंदिर पहावयास मिळते या मंदिरात श्री वासुदेवलिंग व शाळुंका आहेत. समाधीच्या मागील बाजूस स्वामी महाराजांचे छायाचित्र आहे समाधीच्या पुढील बाजूस शूद्र-भक्त सेवकाला दिलेल्या पाषाणाच्या पादुका आहेत.


Garudeshwar Datta Mandir in Marathi - श्री गरुडेश्वर दत्त मंदिर

 

        मंदिराच्या बाजूस नर्मदा नदीवरील डॅमचे विहंगम दृश्य पहावयास मिळते. बाजूला टेकडीवर महाप्रसादासाठी सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. संस्थाना मधून कुपन घेऊन आपण येथे महाप्रसाद करू शकता. नर्मदा परिक्रमावासी यांना धर्मशाळेमध्ये मोफत वास्तव्याची सोय केली जाते.

 

श्रीक्षेत्र नरसोबावाडी दर्शन याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
 https://www.kaujourneys.com/2023/12/temples-in-maharashtra.html 


Garudeshwar Datta Mandir in Marathi - श्री गरुडेश्वर दत्त मंदिर


           सकाळी ००:०९ ते १०:०० व संध्याकाळी ००:०५ ते ००:०६ या वेळेत संस्थानाच्या कार्यालयात महाप्रसादाचे कुपन मिळतात ₹५०/ प्रति व्यक्ती. 



संपर्क : श्री गरुडेश्वर दत्त देवस्थान (०२६४०) २३७००५

संदर्भ : श्री थोरले स्वामी महाराज : -- लेखक डॉक्टर केशव रामचंद्र जोशी महाराज