Datta Mandir Kumasi in Marathi | श्रीक्षेत्र कुमसी दत्त मंदिर

 श्रीक्षेत्र कुमसी

श्रीक्षेत्र कुमसी, kumsi Datta Mandir

                          दत्त क्षेत्रामधील एक अपरिचित असे असणारे श्रीक्षेत्र कुमसी, कर्नाटक राज्यातील विजयपूर तालुक्यातील सिंदगी येथे हे क्षेत्र वसले आहे. हे क्षेत्र विश्वरूप दर्शन स्थळ म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. येथे येण्यासाठी मुंबईहून गाणगापूर रोड स्थानक येथे उतरावे व तेथून टॅक्सी उपलब्ध आहेत. गाणगापूर पासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे. किंवा अक्कलकोट (श्री स्वामी समर्थ मंदिर) येथून टॅक्सीने देखील आपण कुमसी येथे जाऊ शकतो. मुंबई ते अक्कलकोट एसटी शिवशाही तसेच खाजगी ट्रॅव्हल्स बसेस आहेत, रेल्वे सेवा देखील उपलब्ध आहे.

                   त्रिविक्रमभारती नावाचे थोर (नृसिंह) उग्र नरसिंह भक्त कुमसी गावात राहत होते. ते दररोज मानसपूजा करत, पूजेमध्ये ते नृसिंहांशी चर्चा करत असत. त्यांच्या कानावर नृसिंहसरस्वती स्वामीमहाराज (दत्तात्रेयांचा दुसरा अवतार) यांची ख्याती गेल्यावर त्रिविक्रमभारती यांनी नृसिंहसरस्वतीस्वामींना 'दांभिक संन्यासी' वगैरे म्हणत टीका सुरू केली. महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर महाराज आपल्या चतुरंग सेनेबरोबर निघाले. तेव्हा त्रिविक्रम भारती मानसपूजा करत होते परंतु त्यादिवशी नृसिंहांनी त्रिविक्रमभारती यांना दर्शन दिले नाही. काही काळानंतर महाराजांची सेनेबरोबर स्वारी त्यांना नदी काठावरून जाताना दिसली तेव्हा पालखीमध्ये प्रत्यक्ष नृसिंह बसले आहेत असे त्यांना दिसले. त्रिविक्रम भारती महाराजांना शरण गेले व महाराजांना विचारले तुम्ही कोण आहात? तुमचे मूळ रूप काय? त्यामुळे जगत पालक श्री सद्गुरु नृसिंहसरस्वतीस्वामीमहाराजांना त्यांची दया आली व त्यांनी अखंड चराचर व्यापून टाकणारे असे विश्वरूप दर्शन त्रिविक्रमभारती यांना दिले. (शास्त्र पुराणानुसार परमेश्वरांनी आपले विश्वरूप दर्शन प्रथम कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले होते व दुसऱ्यावेळी श्री नृसिंहसरस्वती स्वामीमहाराजांनी त्रिविक्रमभारती यांना दाखवले.) नंतर त्रिविक्रम भारती यांचा उद्धार करून स्वामी पुन्हा गाणगापूरला गेले. या कथेचा उल्लेख आपणास श्रीगुरुचरित्र या ग्रंथांमध्ये आढळतो.


श्री गरुडेश्वर दत्त मंदिर याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.  
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_11.html


श्रीक्षेत्र कुमसी, kumsi Datta Mandir


             सद्यस्थितीला श्री कुमसी या क्षेत्री विश्वरूप पादुका आहेत तसेच त्याच्या बाजूला श्री संत त्रिविक्रमभारती यांची समाधी आहे.

          या क्षेत्राचा जीर्णोद्धार करण्यासाठी "श्री त्रिविक्रम भारती सेवा समिती" कार्यरत आहे. हे क्षेत्र अजूनही अपरिचित असल्यामुळे तेथे माणसांची वर्दळ कमी असते.

           वैशाख शुद्ध दशमी या दिवशी त्रिविक्रम भारती यांना विश्वरूप दर्शन झाले तो दिवस येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गाणगापूर  दत्त मंदिर येथून पायी पालखी येते.


श्रीक्षेत्र कुमसी, kumsi Datta Mandir

श्रीक्षेत्र नरसोबावाडी दर्शन याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.    https://www.kaujourneys.com/2023/12/temples-in-maharashtra.html 


"श्री 
त्रिविक्रम भारती सेवा समिती" जीर्णोद्धार योजना :

श्री दत्तात्रेय नृसिंहसरस्वती स्वामीमहाराज मंदिर व त्रिविक्रमभारती यांचे समाधी मंदिर 

गोशाळा 

हिंदू धर्माच्या परंपरेतील गुरुकुल स्थापन करणे 

अनाथ मुलांसाठी शिक्षण व राहण्याची व्यवस्था 

वृद्धाश्रम गोरगरिबांसाठी मुक्त आरोग्य केंद्र
ध्यानमंदिर निर्माण


इसवी सन १३६० मध्ये मोडी लिपीतून लिहिलेले विश्वरूप दर्शनाचे महत्व हे आपण छायाचित्रात पाहू शकता.

श्रीक्षेत्र कुमसी, kumsi Datta Mandir


श्री रघुनाथ भट जोशी --  दुरध्वनी : ०७४११४२८०१९

श्रीक्षेत्र कुमसी, kumsi Datta Mandir

मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post.html