Datta Guru in Marathi | दत्तात्रेयांचे २४ गुरु 1

 

                  दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण या सदरात दत्तात्रेयांचे २४ गुरु त्यामागील सखोल ज्ञानाचे थोडक्यात विश्लेषण जाणून घेऊया.


1) पृथ्वी ,   2) पवन ( वायु ),  3) व्योम ( आकाश ),  4) उदक ( पाणी ),  5) अग्नी ( आग )

6) चंद्रमा ( चंद्र ),  7) कालात्मा ( किरणांचा आत्मा ),  8) कपोत ( कबूतर ,पारवा ),  9) अजगर,  10) समुद्र,  

11) पतंग ( पतंग पक्षी ),  12) मधुहा ( मधमाशी ),  13) भृंग ( भुंगा ), 14) मातंग ( हत्ती ),  ,  15) मृग ( हरीण ),  

16) मत्स्य ( मासा ),  17) पिंगळा ( वैश्या ),  18) कुरर ( टिटवी ),  19) बालक,  

20) कंकण कुमारीकेचे , ( कुमारीकेची बांगडी ),  21) सर्प,  22) शरकार ( बाण तयार करणारा ),  

23) पेशस्कार ( कुंभारीण माशी ) ,  24) कोळी  


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru

1)    
पृथ्वी : पृथ्वीवर जे वृक्ष आहेत ते नित्य उभे राहून जन्मभर परोपकार करतात अनेक पक्षी प्राणी येथे घरे करून राहतात ते कोणतीही शंका मनात धरता नित्य परोपकारवृत्तिने दुसऱ्याची सेवा करत असतात त्याप्रमाणे "आपण नेहमी परोपकार वृत्ती अंगीकारावी".

दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru


2)     पवन ( वारा ) : वाहत असताना श्वेत उष्ण असा भेदभाव करत नाही. त्याप्रमाणे माणसाने कोणताही भेद करता आपला व्यवहार करावा इतर वासांमध्ये मिसळून सुद्धा वारा वेगळा राहतो त्याप्रमाणे "देहामध्ये राहून अहंपणा सोडून द्यावा. प्रणवृत्तिने  संतोष राहणे हे वाऱ्यापासून शिकणे".

मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post.html


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru


3) व्योम ( आकाश ) : आत्मा चराचर व्यापून निर्विकारपणे एक आहे, हे ज्ञान आकाशापासून शिकता येते. नदीच्या पुराप्रमाणे काल, कर्म, गुण, हेतू हे आवरण असलेले असा आत्मा एकत्र पुढे चालला आहे. ज्यांनी याचा विचार केला नाही ते यात वाहून जातात. गुणांची जो पारख करतो त्याला सर्वजण काळ म्हणतात "सत्व, रज, तम हे गुण त्याला निमित्त ठरतात सर्व देह नष्ट झाले तरी आत्मा अमर असतो तो आकाशाप्रमाणे व्यापक निर्विकारी असतो"
दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru


4) उदक ( पाणी ) :  पाण्याप्रमाणे नेहमी स्वच्छ असावे सर्वांशी स्नेह ठेवावा, कोणासही दुखवू नये. स्वच्छ पाण्याकडे माणसे आकर्षित होतात. सर्वांमध्ये मिसळून तीर्थ स्वतः पवित्र असते व इतरांना पवित्र करते त्याप्रमाणे आपले वागणे असावे. पाणी स्वतःच्या पोटात मळ ठेवून इतरांचा मळ काढून टाकते, त्याप्रमाणे आपले समाजात वर्तन असावे. पाण्याला गती मिळाल्यावर मोठी झाडे उन्मळून पडतात. छोट्या वेली तरतात त्याप्रमाणे "गर्व करणारी माणसे नष्ट होतात क्षमाशील लीन माणसांना उच्च स्थान प्राप्त होते".


श्रीक्षेत्र नरसोबावाडी दर्शन याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.    https://www.kaujourneys.com/2023/12/temples-in-maharashtra.html 


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru


 5) अग्नी ( आग ) : यज्ञामध्ये ज्या देवांची आहुती असते त्या देवांपर्यंत अग्नी ती पोहोचवतो. त्याचा संग्रह अग्नी स्वतःकडे करत नाही, यज्ञामधील लाकडांची देखील राख होऊन भस्म निर्माण होते.त्याप्रमाणे "मानवाने कोणत्याही गोष्टीचा संग्रह करू नये".


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru


6) चंद्रमा ( चंद्र ) : देहाचे महत्त्व सोडावे हे आपणास चंद्रमा कडून शिकावयास मिळते जेव्हा सूर्य आणि चंद्र एका रेषेत येतात तेव्हा चंद्रकलांचा ऱ्हास होऊन त्या दृष्टीस दिसत नाहीत यास आपण अमावस्या असे म्हणतो. चंद्रकला अमावस्या नंतर क्रमाक्रमाने पंधरा दिवस वाढत जातात पौर्णिमेस पूर्ण चंद्र दिसतो हा चंद्र पूर्ण अंधकार नष्ट करतो.  "आत्मा वाढत नाही किंवा कमी होत नाही देहावरील  विकार हे वाढतात  कमी होतात"


श्रीक्षेत्र कुमसी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता. 
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_20.html


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru


       7) कालात्मा ( किरणांचा आत्मा ) : सूर्याचे प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसते तसा आत्मा व्यक्तीच्या देहामध्ये दिसतो.  उदाहरणार्थ एका भांड्यात पाणी भरून ते सूर्य मंडळा खालून फिरवल्यावर त्यात आपल्याला सूर्याचे प्रतिबिंब दिसते भांड्यातील पाणी जसे हलते तसे सूर्याचे प्रतिबिंब हलते पाण्यावरचा मळ आपल्याला सूर्यावरती दिसतो. त्याप्रमाणे आपल्या आत्म्यावर कोणतीही विकार नसतात तसेच सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीवरील पाणी स्वतःकडे साठवून ठेवतो योग्य वेळी ते परत पृथ्वीस देतो त्याचा अभिमान बाळगत नाही त्याप्रमाणे "जे जे सृष्टीमध्ये उपयुक्त आहे ते सुरक्षित ठेवून योग्य वेळ पाहून परोपकार वृत्तीने दान करावे"


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru


 8) कपोत ( कबूतर ,पारवा ) : वनात कबूतर नर मादी एका घरट्यात राहतात ते आपल्या आयुष्य आनंदात जगत असतात भूक तहान विसरून तो तिचे मन राखतो तीही प्रेमाने त्याचे मन बांधून ठेवते. पुढे ती प्रसूत होऊन अंडे देते. नंतर रात्रंदिवस ती स्वतःच्या उबेने अंड्याचे रक्षण करते  नंतर ती पिल्ले बाहेर आल्यावर ते नर मादी कबूतर बाहेर फिरून त्या मुलांसाठी अन्न आणतात. काही दिवसांनी ती मुले बाहेर पडतात शिकाऱ्यांनी पसरलेल्या जाळ्यात अडकतात त्यांना वाचवण्यासाठी त्यांची माता जाते तीही जाळ्यात अडकते त्या सर्वांना वाचवण्यासाठी तो नर पक्षी जातो तोही अडकतो अशा प्रकारे सर्वजण बंधनात अडकतात त्याचप्रमाणे "मानव परिवारात रमला तर त्याचे मुक्तीचे द्वार दुर्लभ होते".


श्री गरुडेश्वर दत्त मंदिर याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.  
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_11.html


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru

9) अजगर  : अजगर जसा दैवावर विश्वास ठेवून कमी-जास्त, चांगले -वाईट असा भेद करता जे मिळेल ते खाऊन पडून राहतो. कधी त्याला रुचकर तर कधी बेचव खायला मिळते ते संपूर्ण खाऊन तो तिथेच पडून राहतो त्याप्रमाणे "मनुष्याने कमी-जास्त मिळेल ते अन्न प्राशन करून राहावे त्यासाठी उगाच स्वार्थ धरू नये".


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru


10) समुद्र : पावसाळ्यात अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात तेव्हा समुद्र आनंदाने ओसंडून बाहेर येत नाही. तसेच उन्हाळ्यात त्यां नद्या सुकतात तेव्हा समुद्र दुःखाने कोरडा पडत नाही. भोग मिळता आनंदी व्हावे मिळता दीन व्हावे सदा एकरुप असावे. समुद्राची लांबी, रुंदी, खोली, त्यातील रत्ने किती हे जसे कळत नाही त्याप्रमाणे "योग्यानेही कोणताही भेद करता नेहमी प्रसन्न राहावे".


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru

11) पतंग ( पतंग पक्षी ) : प्रकाशाचा दिवा दिसल्यावर ज्याप्रमाणे पतंग पक्षी त्यावर झेप घेतो त्या दिव्यावर तो जळून जातो. त्याचप्रमाणे "स्त्रियांचे सौंदर्य पाहून जो नर मोहित होतो त्याचा शेवटी अंत होतो".


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru


12) मधुहा ( मधमाशी ) : प्रत्येक फुलांमधून अत्यंत मेहनतीने मध गोळा करतात तो साठवून ठेवतात तो साठवताना त्या स्वतः देखील मधाचा आस्वाद घेत नाहीत.  कोणास घेऊ देत नाहीत. नंतर मानव ते मधाचे पोळे काढून घेऊन जातो त्याप्रमाणे "अती लालसे पोटी खूप मोठा संग्रह केल्यास तो व्यर्थ जातो".


दत्तात्रेयांचे २४ गुरु  याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.  https://www.kaujourneys.com/2023/12/guru-datta-2.html


 पुढील लेखात आपण उरलेले गुरु व त्यांपासून घेतलेला उपदेश पाहू..