Datta Guru in Marathi | दत्तात्रेयांचे २४ गुरु 2

दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण दत्तात्रेयांचे २४ गुरु  त्यामागील सखोल ज्ञानाचे थोडक्यात विश्लेषण जाणून घेत आहोत.

मागील सदरात आपण पहिले बारा गुरु पाहिले या सदरात आपण पुढील गुरुंबद्दल माहिती जाणून घेऊया.


13) भृंग ( भुंगा ), 14) मातंग ( हत्ती ), 14) मधुहा ( मधमाशी ),  15) मृग ( हरीण ),  

16) मत्स्य ( मासा ),  17) पिंगळा ( वैश्या ),  18) कुरर ( टिटवी ),  19) बालक,  

20) कंकण कुमारीकेचे , ( कुमारीकेची बांगडी ),  21) सर्प,  22) शरकार ( बाण तयार करणारा ),  

23) पेशस्कार ( कुंभारीण माशी ) ,  24) कोळी 


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2


13) भृंग ( भुंगा ) : भुंगा कमळात जातो व सूर्यास्तानंतर कमळाची पाती बंद झाल्यामुळे तो आतमध्ये अडकून मृत होतो. त्याप्रमाणे आवश्यक तेवढाच संग्रह आपल्याकडे करावा  अती हव्यास केल्यास तो विनाशास कारणीभूत ठरतो.


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

14)  मातंग ( हत्ती ) : नारी बद्दल अति स्नेहाची भावना जडल्यास त्यातून नाश होतो. जसे मदमस्त हत्तीला पकडण्यासाठी एका खड्यामध्ये लाकडाची हत्तीण उभी केल्यावर हत्ती तिच्याजवळ जातो व खड्ड्यात पडून बंदिस्त होतो. त्याप्रमाणे जे नर स्त्री पाहून आकर्षित होतात त्यांचा विनाश होतो. हा गजापासून उपदेश घ्यावा.

श्री गरुडेश्वर दत्त मंदिर याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.  
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_11.html


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2


15) मृग (हरीण) : वनामध्ये हरिण स्वच्छंदपणे अत्यंत जलद गतीने भ्रमण करताना तंतुवाद्यांचा आवाज ऐकून त्याकडे आकर्षित होतात व अलगदपणे पारधी ( शिकाऱ्याच्या ) जाळ्यात अडकतात. त्याप्रमाणे गायन, नृत्य, संगीत कोणत्याही मोहापाषात न अडकता ध्यान करावे.


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

16) मत्स्य (मासा) : पाण्यामध्ये राहणारा मासा जसा जिभेच्या हट्टामुळे मांसयुक्त गळाला अडकतो. तसा शूर पराक्रमी माणूस देखील जिभेमुळे पराभूत होतो. जीभ जिंकली म्हणजे सर्व जिंकल्यासारखे आहे. 


श्रीक्षेत्र नरसोबावाडी दर्शन याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.    https://www.kaujourneys.com/2023/12/temples-in-maharashtra.html


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

17) पिंगळा (वेश्या) :माणसाच्या मनात येणाऱ्या इच्छा या त्याला भय, शोक, मोह यामध्ये ढकलतात.


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

18) टिटवी (कूरर) : कूरर पक्ष्यांचा थवा मांसाला विभागून खाताना ज्यांना जो भाग आवडेल  तो भाग ते खातात  नंतर ज्यांच्याकडे शिल्लक राहिले त्याला बाकीचे टोचू लागतात.  त्यांनी अधिकचे ते मांस सोडले असता बाकीचे टोचणे बंद करतात. या उदाहरणाप्रमाणे  जेवढे आवश्यक आहे त्याचा संग्रह करावा.


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

19) बालक (लहान बाळ) : घरात श्रीमंती-गरिबी आहे, आपले मरण कधी येईल, आपली कीर्ती-अपकीर्ती होईल, धन कसे मिळवावे, ते कसे जपावे, परिवाराची काळजी कशी करावी या व इतर चिंता लहान बाळ करत नाहीत त्यामुळे ते सुखी असतात मानव या चिंता करतो म्हणून तो दुःखी होतो.


श्रीक्षेत्र कुमसी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता. 
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_20.html


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

20) कुमारीकेचे कंकण (कुमारीकेची बांगडी) : कुमारिकेच्या हातातील बांगड्यांचा आवाज होतो. तेव्हा तिला वाईट वाटते सर्व बांगड्या काढल्या तर पूर्वजांना दोष लागेल म्हणून ती एक एक कंकण हातात ठेवते त्याचा आवाजही होत नाही व दोषही लागत नाही या उदाहरणाप्रमाणे  योग्यांनी एकटे राहून अभ्यास करावा संगतीमुळे दोष निर्माण होतो.

 
दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

21) सर्प (साप) : साप कधीही आपले घर बांधत नाही. तो सतत भ्रमण करत असतो.संपूर्ण आयुष्यात आपण नदीच्या पुराप्रमाणे पळत असतो, पुराचे पाणी परत मागे येत नाही त्याप्रमाणे योग्यांनी सतत भ्रमण करत राहावे.


दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

22) शरकार ( बाण तयार करणारा ) : राजाची मिरवणूक समोरून जात असताना शरकारला (धनुष्याचे बाण तयार करणाऱ्या माणसाला) त्याबद्दल माहिती नसते व तो आपले बाण बनवण्यात एकाग्रचित्ताने  व्यस्त असतो. त्याप्रमाणे योग्यांनी एकाग्र होऊन ध्यान अभ्यास करावा.


मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post.html 



दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

23) पेशस्कार ( कुंभारीण माशी ) : आपण नेहमी ज्याचे ध्यान करतो त्याप्रमाणे आपणास गती मिळते म्हणजेच कुंभारीण भिंतीवरील त्याच्या घरात  आणलेल्या कीटकावर पुन्हा पुन्हा येऊन नांगी मारतो त्याप्रमाणे वर्ण आश्रम जाती सर्व सोडून ईश्वराचे चिंतन करतो तो त्या गतीला मोक्षाला प्राप्त होतो. 



दत्तात्रेयांचे २४ गुरु Datta Guru 2

24)  ( कोळी ) : कोळी आपल्या नाभी (बेंबी) पासून सूत्र काढून स्वतःचे घर बांधतो व नंतर तेच घर स्वतः खाऊन टाकतो. त्याप्रमाणे ईश्वरांनी हे जग निर्माण केले आहे व तोच संहार करून हे नष्ट करणार आहे. हे नेहमी ध्यानात ठेवावे. 


दत्तात्रेयांचे २४ गुरु 1 याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/datta-guru.html