Sri Kshetra Narsobawadi Temple in Marathi | श्री क्षेत्र नरसोबावाडी दत्त मंदिर

                           

Sri Kshetra Narsobawadi Temple in Marathi श्री क्षेत्र नरसोबावाडी दत्त मंदिर


 || अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ||

                     दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांच्या ( एक तप ) १२ वर्ष वास्तव्यामुळे व त्यांच्या मनोहर पादुकांमुळे श्री दत्ताची राजधानी म्हणून नृसिंहवाडी हे क्षेत्र निर्माण झाले आहे.

                  नरसोबाची वाडी अर्थात नृसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहे. या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी जगभरातून हजारो भक्त येत असतात. येथे येण्यासाठी मुंबई वरून रेल्वेची व्यवस्था आहे. मुंबईवरून रात्री ०८:२० वाजता (१७४११) महालक्ष्मी एक्सप्रेस ने निघाल्यावर सकाळी आपण मिरज स्टेशनला पोहोचतो.मुंबई ते मिरज रेल्वेचे तिकीट साधारणता स्लीपर क्लास ₹३१५/ व एसी थ्री टियर ₹८४५/ आहे. येथे उतरल्यावर स्टेशन पासून चालत पाच मिनिटाच्या अंतरावर एसटी स्टँड आहे. येथून कुरुंदवाड बस असतात, त्यांनी आपण नरसोबाची वाडी येथे पोहोचू शकतो. तसेच मिरज च्या पुढील स्टेशन जयसिंगपूर येथून देखील कुरुंदवाड बस उपलब्ध आहेत. मुंबईतून मिरजला जाण्यासाठी शिवशाही बसेस तसेच खाजगी बसेस पण उपलब्ध आहेत. 


श्री दत्त मंदिर माणगाव याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2024/01/shree-datta-mandir-mangaon-in-marathi.html


               नरसोबाच्या वाडीला उतरल्यावर आपणास तेथे अनेक हॉटेल्स, धर्मशाळा तसेच मंगल कार्यालय येथे राहण्याची सोय आहे. येथे नाश्ता करून झाल्यानंतर कृष्णामाईच्या विस्तीर्ण पात्रामध्ये स्नान करून श्री दत्तात्रेयांचे दर्शन घ्यावे. त्यानंतर मंदिराच्या वरील भागात थोर संत श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज,  गोपाळ स्वामीमहाराज, मौनी स्वामीमहाराज, यांच्या समाधीचे दर्शन घ्यावे. दुपारी प्रसाद घेतल्यानंतर कृष्णा नदीच्या समोरील घाटावर औरवाड  मंदिर आहे.  तेथे दर्शन घ्यावे गुरुचरित्रातील घेवडावेल उपटून ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले ती कथा येथे घडली आहे.

                          त्यानंतर श्री दत्त भोजन पात्र मंदिर शिरोळ, पांडवकालीन कोपेश्वर महादेव मंदिर खिद्रापूर, श्री दत्त भिक्षा लिंग स्थान, यांचे दर्शन घ्यावे यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी आपणास येथे मिळतात. 

Sri Kshetra Narsobawadi Temple in Marathi श्री क्षेत्र नरसोबावाडी दत्त मंदिर


श्रीक्षेत्र कुमसी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता. 
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_20.html



            रात्री नृसिंहवाडी येथील  महाराजांच्या स्वारीचा नयनरम्य पालखी सोहळ्याचा अनुभव घ्यावा.रात्री ०८:५० वाजता मिरज वरून मुंबई करता (१७४१२) महालक्ष्मी एक्सप्रेस आहे. तिकीट साधारणता स्लीपर क्लास ₹३१५/ व एसी थ्री टियर ₹८४५/ आहे. 

नृसिंह वाडी जवळील धार्मिक प्रेक्षणीय स्थळे व अंतर 
नृसिंहवाडी : दत्त मंदिर, नारायण स्वामी मठ, टेंबेस्वामी मठ, पाटील महाराज मठ, शुक्लतीर्थ, वेदपाठ शाळा 
अमरापूर (औरवाड) : दत्त मंदिर १ कि. मी. 
कुरुंदवाड : पुरातन कालीन श्रीविष्णू मंदिर, गणपती मंदिर घाट, अंतर २ कि. मी.
अकिवाट : श्री पार्श्वनाथ मंदिर लकव्यावरील औषध, अंतर १० कि. मी.
गणेशवाडी : श्री गणपती मंदिर, अंतर १० कि. मी. 
खिद्रापूर : पुरातनकालीन श्री कोपेश्वर मंदिर अंतर १८ कि. मी. 
शिरोळ : श्री दत्त भोजन पात्र मंदिर अंतर ५  कि. मी.
सांगली : भव्य गणपती मंदिर अंतर २२ कि. मी.
औदुंबर : श्री दत्त मंदिर अंतर ५० कि. मी.
तासगाव : श्री गणपती मंदिर अंतर ५० कि. मी. 
रामलिंग धुळोबा : श्री शंकराचे भुयारातील मंदिर अंतर ३८  कि. मी.
आळते : श्रीपती समेद शिरारजी, अंतर २७  कि. मी.
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मंदिर, पंचगंगा घाट, रंकाळा तलाव, अंतर ५५  कि. मी.
पन्हाळा : थंड हवेचे ठिकाण ऐतिहासिक किल्ला अंतर ७५ कि. मी.
ज्योतिबा : श्री ज्योतिबा मंदिर अंतर ७५ कि. मी.
पैजारवाडी : श्री चिले महाराज समाधी मंदिर अंतर ८० कि. मी.
टोप संभापूर : आशिया खंडातील सर्वात भव्य गणेश मूर्ती अंतर ५५ कि. मी.

श्री गरुडेश्वर दत्त मंदिर याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.  
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_11.html

Sri Kshetra Narsobawadi Temple in Marathi श्री क्षेत्र नरसोबावाडी दत्त मंदिर