Konkan Beach Bhogwe In Marathi | भोगवे बीच

               

Konkan Beach, Bhogway | भोगवे बीच

भोगवे बीच Bhogwe Beach

               नैसर्गिक विविधतेने नटलेल्या अशा आपल्या भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत महाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग हा पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. कोकणाला एकूण सातशेवीस किलोमीटर लांब समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्यावर अनेक ठिकाणी नैसर्गिक रित्या तयार झालेली अनेक पर्यटन स्थळे आपणास पहावयास मिळतात. या किनारपट्टी भागातील विशिष्ट अशा संस्कृतीमुळे येथील पर्यटनास विशेष आनंद घेता येतो. या भागात आपण कोकणातल्या भोगवे बीच (Konkan Beach Bhogwe) बद्दल माहिती घेणार आहोत. 

                 भोगवे बीच हे महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात येते. येथे येण्यासाठी आपणास रस्ते ,रेल्वे व विमानसेवा उपलब्ध आहे. मुंबई गोवा महामार्ग, मुंबई सिंधुदुर्ग व्हाया पुणे महामार्ग व सागरी महामार्ग असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. तसेच मुंबईवरून कुडाळ पर्यंत कोकण रेल्वे सेवा आहे. याचे तिकीट साधारणतः ९००/ आहे. मुंबई ते चिपी विमान सेवा आहे. याचे तिकीट साधारणतः ₹२५००/ आहे.हे आपण मागील भागात पाहिले.


सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती येथे पाहता येईल.
https://www.kaujourneys.com/2022/10/121.html

               

Konkan Beach, Bhogway | भोगवे बीच

                  रेल्वेने कुडाळ येथे आल्यावर तेथून टॅक्सी व रिक्षा करून आपण पंचेचाळीस मिनिटात भोगवे बीच येथे पोहोचतो. तसेच चिपी विमानतळ येथून पंधरा मिनिटात आपण भोगवे बीच येथे पोहोचतो.

                    भोगवे येथे राहण्यासाठी आपणास उत्तम अशी निवासाची व्यवस्था करता येते. येथे विविध प्रकारची हॉटेल्स उपलब्ध आहेत. यामध्ये खास करून किनाऱ्यावर बांधलेली बांबूची छोटी घरे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. तसेच येथील स्थानिक लोकांनी होम स्टे देखील सुरू केले आहेत.


मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post.html



Konkan Beach, Bhogway | भोगवे बीच

                            येथे आपणास शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे कोकणी पद्धतीचे भोजन मिळते यामध्ये कोकणी मसाले व नारळाचे खोबरे यांचा वापर केलेला असतो. तसेच विविध प्रकारचे स्थानिक मासे व शाकाहारी लोकांसाठी स्थानिक गोड पदार्थ येथे आपणास खावयास मिळतात. दुपारी भोजन झाल्यावर आपण बीचवर जाऊन विविध प्रकारचे जलक्रीडा (Water sports) करू शकतो.


Konkan Beach

1) Surfing: Riding ocean waves on a surfboard.

2) Snorkeling: Exploring underwater life using a mask and snorkel.

3) Scuba Diving: Deep-sea diving with specialized equipment to explore underwater environments.

4) Kayaking: Paddling in a small boat, usually for recreation or exploration.

5) Jet Skiing: Riding a small motorized watercraft.

6) Windsurfing: Riding on a board with an attached sail, powered by wind.

7) Parasailing: Being towed behind a boat while attached to a parachute.

8) Kiteboarding/Kitesurfing: Riding a board while being pulled by a large kite.

9) Water Skiing: Being pulled behind a boat on skis.

10) Paddleboarding: Standing on a board and propelling oneself with a paddle.

                           

Konkan Beach, Bhogway | भोगवे बीच

                              रात्री भोजन करून समुद्रकिनाऱ्याच्या निरव शांततेत झोपी जावे. सकाळी सूर्योदय पाहण्याचा उत्तम असा अनुभव आपण घ्यावा. समुद्र किनाऱ्यावरून सूर्योदय व सूर्यास्त पाहण्याचा एक वेगळाच अनुभव मनाला शांत करून जातो.


मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वे 
जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५१) 
तेजस एक्सप्रेस (२२११९) 
वंदे भारत  एक्सप्रेस (२२२२९) 
मांडवी एक्सप्रेस (१०१०३) 
नेत्रावती एक्सप्रेस (१६३४५) 
कोकणकन्या एक्सप्रेस (२०१११) 
तुतारी एक्सप्रेस (११००३) 
दिवा सावंतवाडी एक्सप्रेस (१०१०५)