Shree Datta Mandir Mangaon in Marathi | श्री दत्त मंदिर माणगाव

    
Datta Mandir Mangaon

     माणगाव भारत वर्षातील थोर संत श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीटेंबेस्वामी महाराज यांचे जन्मस्थळ.

             महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात माणगाव हे छोटेसे गाव वसले आहे.मुंबईहून माणगाव येथे जाण्यासाठी रेल्वेतर्फे कोकण रेल्वेची सोय आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या खाजगी बसेस देखील उपलब्ध आहेत. रेल्वेने जाताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ स्थानकात उतरल्यावर तेथून बस, टॅक्सी किंवा रिक्षा यांनी माणगावला जाऊ शकतो. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुडाळ अंतर ५५७ कि.मी. आहे. कुडाळ रेल्वे स्टेशन ते माणगाव दत्त मंदिर अंतर १७. ५ कि. मी. आहे.

               माणगावात श्री वासुदेव टेंबे यांचा जन्म झाला.(टेंबे म्हणजे छोटीशी टेकडी)  या टेकडीवर राहणारे म्हणून टेंबे. माणगावात त्यांचे शिक्षण झाले. दत्तभक्तित न्हाऊन निघालेले वासुदेव यांना आदर युक्त तेथील माणसे वासुदेव शास्त्री या नावाने ओळखत. महाराजांसोबत महाराजांची पत्नी, आई व बंधू हे देखील येथे राहत असत. दत्त महाराजांच्या आज्ञेवरून श्री वासुदेव शास्त्री यांनी माणगाव सोडले पुढे संन्यास घेतल्यानंतर त्यांना श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंदसरस्वतीटेंबेस्वामी महाराज  या नावाने ते प्रख्यात झाले. स्वामी महाराजांनी आसेतु-हिमाचल म्हणजेच भारताच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत सर्व प्रदेशामध्ये पायी भ्रमंती केली. यामध्ये महाराजांनी २३ चतुर्मास केले. क्षेत्र श्री दत्त मंदिर माणगाव Shree Datta Mandir Mangaon हे दत्त भक्तांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. 


श्रीक्षेत्र नरसोबावाडी दर्शन याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/temples-in-maharashtra.html


Datta Mandir Mangaon

                        माणगाव दत्त मंदिर येथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे. कुडाळ किंवा सावंतवाडी येथे हॉटेल मध्ये देखील राहण्याची उत्तम सोय आहे. माणगाव दत्त मंदिर येथे पार्किंग साठी प्रशस्त अशी सोय आहे. मुख्य मंदिरात श्री दत्त महाराजांची मूर्ती व श्री टेंबे स्वामी महाराजांची मूर्ती आपणास पहावयास मिळते. मुख्य मंदिराच्या सभोवताली प्रदक्षिणा मार्गाच्या वर आधुनिक असा भव्य सभामंडप उभारला आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे. सायंकाळी पालखीच्या वेळी व उत्सवाच्या वेळी हा सभा मंडप गर्दीने भरून जातो.या मंदिराचा जिर्णोद्धार महाराणी इंदिराबाई होळकर इंदोर यांनी केला व कायमस्वरूपी पूजेची व्यवस्था केली. १२ मे १९३८ रोजी  मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. 


Datta Mandir Mangaon

           सभामंडपाच्या दोन्ही बाजूला दोन लाकडी भव्य असे खांब दिसतात श्री दत्त मंदिराच्या स्थापनेपासून हे लाकडी खांब मंदिराच्या दोन्ही बाजूला आहेत. स्वामी महाराज असताना भूत प्रेत पिशाच्च असणारे भक्त आरतीला धुप घातला की या खाबांना घट्ट पकडून ठेवत असत. महाराज त्या पिशाच्च बाधितांना उपासना सांगत व त्यायोग्य ते पिशाच्च बाधेपासून मुक्त होत असत. 


श्रीक्षेत्र कुमसी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता. 
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_20.html

                     

Datta Mandir Mangaon

                           दत्त मंदिराच्या बाजूला महाप्रसादासाठी प्रशस्त असा सभा मंडप आहे. यात कुपन देऊन महाप्रसाद दिला जातो. मंदिराच्या समोरील बाजूस श्रीदेवी यक्षिणी मंदिर आहे. श्रीदेवी यक्षिणी मंदिराच्या बाजूला श्री स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे. तेथे श्री स्वामी महाराजांची पूर्णाकृती भव्य अशी मूर्ती आपणास पहावयास मिळते. 

             

Datta Mandir Mangaon

               स्वामी महाराजांच्या निवासस्थानाबद्दल एक कथा आहे. जेव्हा या घरामध्ये वास्तुशांती समारंभ आयोजित केलेला त्यावेळी घरातील काही वादामुळे मुहूर्त टळत होता तेव्हा स्वामी महाराज क्रोधित झाले व त्यांनी या घराची धर्मशाळा होईल असा शाप दिला. पुढे येथेच अनेक पांथस्थ दत्तभक्त येऊन राहत असत. 


श्री गरुडेश्वर दत्त मंदिर याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.  
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_11.html

                   
Datta Mandir Mangaon

                        मंदिराच्या आजूबाजूला पुस्तके व इतर धार्मिक साहित्य  यांची दुकाने आहेत. मुख्य दत्त मंदिराच्या उजव्या बाजूने मागच्या बाजूला वर डोंगरात स्वामी महाराजांच्या ध्यानगुहेकडे एक रस्ता जातो. या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर श्री संत गुळवणी महाराज सिद्धयोग आश्रम आपणास पाहावयास मिळतो. हा आश्रम श्री संत केशवरावजी रामचंद्र जोशी महाराज यांनी स्थापन केलेला आहे. पुढे गुहेत गेल्यावर मन प्रसन्न, एकाग्र करणारी शांतता आपणास मिळते
                 

               मुख्य दत्तमंदिरा पासून ध्यानगुहा हे अंतर जाण्यासाठी साधारणता: ३० मिनिटे लागतात.

श्री दत्त मंदिर ते सावंतवाडी बस स्टँड : १३.४ कि. मी.
श्री दत्त मंदिर ते कुडाळ बस स्टँड : १६.३ कि. मी.


जवळील धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे

 
श्री देवाचा डोंगर ( श्री मच्छिंद्रनाथ यांची तपोभूमी )  २२.५ कि. मी.
गणपती मंदिर रेडी येथील    ४५.३ कि. मी.
श्री देव आदिनारायण मंदिर परुळे  ३६.२ कि. मी.
श्री देव वेतोबा मंदिर परुळे  ३०.५ कि. मी.
श्री कुणकेश्वर मंदिर कणकवली  १०० कि. मी.
श्री लक्ष्मीनारायण मंदिर  २६.२ 
कि. मी.