Shri Aadinarayan temple in Marathi, maharashtra temple, Sun temple | श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र

 श्री देव आदिनारायण देवस्थान परुळे

Shri Aadinarayan temple in Marathi, maharashtra temple, Sun temple  | श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र

महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील प्रसिद्ध असे सूर्य मंदिर 

                        अखंड हिंदुस्तानात ठराविक ठिकाणी आपणास सूर्य मंदिर पहावयास मिळतात. सूर्य हे तेजाचे प्रतीक मानले आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिर जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सूर्य मंदिर आदिनारायण मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक येऊन दर्शन घेतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये परुळे या गावी हे मंदिर स्थित आहे. 

Shri Aadinarayan temple in Marathi, maharashtra temple, Sun temple  | श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र

                     या मंदिराला प्राचीन असा इतिहास लाभला आहे. इतिहासात बघितले असता साधारणतः इसवी सन १२०० च्या आसपास या मंदिराची निर्मिती झाली असे दिसून येते. कालौघात या मंदिराचा जीर्णोद्धार अनेक वेळा करण्यात आले. सध्या आपणास दिसणारे मंदिर हे आधुनिक काळात जीर्णोद्धार झालेले मंदिर आहे.

मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post.html 

Shri Aadinarayan temple in Marathi, maharashtra temple, Sun temple  | श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र

                             मुख्य मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणातील आहे. मूर्तीच्या खालील बाजूस सात अश्व आहेत व स्वतः आदिनारायण त्याचे सारथ्य करत आहेत.आदिनारायण म्हणजेच (आदित्य नारायण) अर्थात सूर्य धनंजय गोत्री यांचे हे कुलदैवत आहे. सूर्य उपासना ही श्रेष्ठ उपासना मानली जाते दैनंदिन नित्य विधी मध्ये दररोज सूर्याला अर्घ्य देणे हे पवित्र मानले जाते.

Shri Aadinarayan temple in Marathi, maharashtra temple, Sun temple  | श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र

                             आदिनारायण मंदिर कुडाळ रेल्वे स्टेशन पासून सुमारे ३५ मिनिटे अंतरावर आहे. मुख्य मंदिर हे अत्यंत प्रशस्त असे आहे. मंदिराच्या समोरील बाजूस भव्य असा सभामंडप आहे. मंदिराचे छत हे पारंपारिक कौलारू आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस आपणास प्रशस्त अशी धर्मशाळा पहावयास मिळते. येथे राहण्याची उत्तम अशी सोय होते. येथे राहण्यासाठी रूम हवी असल्यास अगोदर संस्थानाशी संपर्क करावा.

श्रीक्षेत्र नरसोबावाडी दर्शन याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.    
https://www.kaujourneys.com/2023/12/temples-in-maharashtra.html

Shri Aadinarayan temple in Marathi, maharashtra temple, Sun temple  | श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र

                         आदिनारायण मंदिरात दरवर्षी रथसप्तमीचा तीन दिवस मोठा उत्सव होतो. या काळात हजारो भाविक भगवान श्री देवआदिनारायण यांचे दर्शन घेतात. या काळात मंदिरामध्ये सौरयाग व अनेक धार्मिक विधी केले जातात. तरुण तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात, तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जातात. या काळात शेकडो भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. संध्याकाळी असणारा पालखी सोहळा अत्यंत नयनरम्य असतो. पालखी सोहळ्याच्या वेळी गायली जाणारी पदे ही मनाला शांती देतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक या उत्सवासाठी व श्री देव आदिनारायण यांच्या दर्शनासाठी येतात. 

Shri Aadinarayan temple in Marathi, maharashtra temple, Sun temple  | श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र

Shri Aadinarayan temple in Marathi, maharashtra temple, Sun temple  | श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र

                       कोणार्क येथील सूर्य मंदिर जगप्रसिद्ध आहे तसे महाराष्ट्रात हे मंदिर प्रसिद्ध आहे. भारतातील अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यनारायणाचे दर्शन घेतात हे मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे. आदिनारायण मंदिरामध्ये अनेक भाविक येऊन सूर्य उपासना करतात. येथून जवळच कोकणातील अनेक निसर्गरम्य समुद्रकिनारे व मालवण बंदर येते.

भोगवे बीच याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता. 
https://www.kaujourneys.com/2024/01/konkan-beach-bhogwe-in-marathi.html 

Shri Aadinarayan temple in Marathi, maharashtra temple, Sun temple  | श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र

श्री भगवती देवी मंदिर परुळे

कुडाळ रेल्वे स्टेशन : २१ कि. मी. 

चिपी सिंधुदुर्ग एअरपोर्ट : २ कि.मी. 

मालवण : १९ कि. मी. 

भोगवे बीच चौपाटी : ६  कि. मी.

मुंबई : ५५० कि. मी.