Gudi padwa In Marathi | गुढीपाडवा माहिती मराठी

Gudi padwa In Marathi | गुढीपाडवा माहिती मराठी

गुढीपाडवा माहिती मराठी | Gudipadwa In Marathi

                  चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी हिंदू धर्माचे नवीन वर्ष सुरू होते. नववर्षाचे स्वागत करून ते वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाण्यासाठी हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आनंदाचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून घरोघरी उंच गुढी उभारली जाते. याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवत ते आयोध्येत परत आले होते तेव्हापासून गुढीपाडवा साजरा केला जातो.

                         या दिवशी प्रत्येक हिंदूच्या घरावर गुढी उभारली जाते या गुढी उभारण्या मागे अनेक कारणे आहेत यामध्ये मुख्य कारणे.


)    याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवत ते आयोध्येत परत आले होते.

)   याच दिवशी शकांनी हुणांचा पराभव करून शालिवाहन शक सुरू केले होते. 


या दोन महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख आपणास पुराणामध्ये आढळतो.


श्रीक्षेत्र कुमसी याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता. 
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_20.html


गुढी उभारणीसाठी लागणारे साहित्य :

 तांब्याचा कलश 

एक मोठी लांब काठी 

फुलांचा हार 

लिंबाच्या पानाचा हार 

साखरेच्या गाठीची माळ 

एक नवीन वस्त्र (साडी)


* गुढीपाडवा कसा साजरा करावा :

                  गुढी ही सूर्योदयानंतर उभारावयाची असते. काठीच्या टोकास वस्त्र साडी बांधावी. त्यावर साखरेच्या गाठी असलेली माळ, कडूलिंबाची पाने असलेली माळ, आंब्याची डहाळी व फुलांचा हार बांधावा. त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवावा. या कलशावर स्वस्तिक चिन्हे काढावीत. गुढी ही नेहमी उंच उभारावी गुढी उभारताना जमिनीवर खाली पाट ठेवावा. त्या पाटावर स्वस्तिकचे चिन्ह काढून त्यावर धान्य, फुले, नैवेद्य ठेवावे  नंतर त्यावर गुढी उभारावी. गुढी सोबत नविन वर्षाचे पंचांग पुजन करावे. नंतर घरातील सर्व सदस्यांनी गुढीस वंदन करावे.


* मुहूर्त :

                यावर्षी गुढी उभारण्यासाठीचा शुभ मुहूर्त इंग्रजी कालगणनेनुसार मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०६:०० ते १०:०० वाजेपर्यंत आहे.


दत्तात्रेयांचे २४ गुरु 1 याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/datta-guru.html


प्रसाद व नैवेद्य : 

            शक्य असल्यास घरात एखादा गोड पदार्थ करून गुढीस नैवेद्य दाखवावा व घरातील सर्व सदस्यांनी नंतर तो ग्रहण करावा. प्रसाद म्हणून कडुलिंबाची पाने खावीत. 


* गुढीचे विसर्जन कसे करावे ? 

         सूर्यास्ताच्या वेळी गुळ खोबरयाचा नैवेद्य दाखवून गुढी उतरावी.