hanuman jayanti 2024 In Marathi |हनुमान जयंती माहिती मराठी


hanuman jayanti 2024  In Marathi |हनुमान जयंती माहिती मराठी


          || राम भक्त श्री हनुमान की जय , हनुमान जयंती ||

           इंग्रजी कालगणनेनुसार दिनांक २३/०४/२०२४ रोजी श्री हनुमान जयंती उत्सव साजरा होत आहे. रामायण व महाभारत या दोन्ही ग्रंथात अत्यंत महत्त्वपूर्ण व पराक्रमी भूमिका निभावलेले सप्तचिरंजीवांपैकी एक सर्वश्रेष्ठ रामभक्त भगवान श्रीहनुमान यांचा जन्मोत्सव.

         चैत्र पौर्णिमेला श्री मारुतीरायांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. वानरराज केसरी व माता अंजनी यांच्या पोटी भगवान श्री मारुतीरायांचा जन्म झाला. मारुतीरायांबद्दल अनेक कथा नेहमी ऐकत असतो.

       श्री मारुतीराया ही शक्तीची देवता म्हणून प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य स्थापनेच्या वेळी संत समर्थ रामदास स्वामी यांनी सर्वत्र फिरून प्रत्येक गावात "गाव तिथे मारुती" अशा संकल्पनेवर गावागावात मारुती मंदिर स्थापन केली. व त्यामुळे गावातील व्यक्ती  एकत्र येऊन व कसरत करून तंदुरुस्त राहतील हा यामागचा उद्देश होता.


दत्तात्रेयांचे २४ गुरु 1 याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/datta-guru.html


        महाराष्ट्रात मुख्यतः अकरा मारुती मंदिरे समर्थ रामदासांनी स्थापन केली. हे सर्व मारुती कृष्णा नदीच्या तीरावर आहेत. ज्यांना मारुतीची शक्तीपीठे म्हणतात. यामध्ये 

  1. चाफळचा दास मारुती 
  2. माजगाव चा मारुती 
  3. शिंगणवाडीचा मारुती 
  4. उंब्रजचा मारुती 
  5. मसूरचा मारुती 
  6. शहापूरचा मारुती 
  7. बहे बोरगावचा मारुती 
  8. मनपाडळेचा मारुती 
  9. माझगाव मारुती 
  10. पारगावचा मारुती
  11. बत्तीस शिराळेचा मारुती  यांचा समावेश होतो
         श्री मारुतीरायाचे श्रेष्ठ भक्त संत तुलसीदास यांनी हनुमानांवर जी चाळीस श्लोकांची रचना केली ती हनुमान चालीसा म्हणून प्रसिद्ध आहे. जे भक्त मनोभावाने "यह सत बार पाठ कर कोई छूटही बंदि महा सुख होई" हनुमान चालीसाचा पाठ करतात ते सर्व पाशातून मुक्त होतात.

            साडेसाती सुरू असलेली माणसे भगवान श्री हनुमान यांच्या मंदिरात जातात. मारुतीरायांवर सुंदरकांड प्रसिद्ध आहे. मारुतीराया श्रीरामांच्या सेवेसाठी लंकेत प्रवास करून गेले, परंतु त्याचे श्रेय त्यांनी स्वतः न घेता श्रीरामांना दिले ",हनुमान - निस्वार्थी कर्मयोगी " असा उल्लेख आपल्याला सुंदरकांड मध्ये दिसतो. जेव्हा लंका दहन करून मारुतीराया परत श्रीरामांकडे आले तेव्हा श्रीरामांनी हनुमानाला मिठी मारली त्याच्यासाठी हा क्षण मोक्ष सुखाचा होता हनुमानजींसारखा ऋषी मनुष्य कोणीही नाही "सुनु सुत तोही उरिन मे नाही"


hanuman jayanti 2024  In Marathi |हनुमान जयंती माहिती मराठी


       श्री हनुमान चालिसाच्या रचनेचे कारण असे की ब्राह्मणाच्या शेवटच्या प्रवासाची तयारी चालू होती. तेथून गोस्वामी तुलसीदासजी जात होते. कुणीतरी येऊन तुलसीदासजींच्या पायाला स्पर्श केला. त्यांनी  अखंड सौभाग्य लाभो असा आशीर्वाद दिला. ती बाई म्हणाली तुमचे शब्द निरुपयोगी आहेत. माझ्या पतीचे नुकतेच निधन झाले .त्यावर तुलसीदासजी म्हणाले माझ्या तोंडातून निघणारे शब्द कधीच खोटे होणार नाहीत. परमेश्वर तुझ्या पतीला जिवंत करेल.त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला  श्रीरामाचे नामस्मरण करण्यास सांगितले. काही काळात मृत ब्राह्मण पुन्हा जिवंत झाला. सम्राट अकबराने तुलसीदासजींना दरबारात हजर राहण्याचा आदेश दिला. गोस्वामी तुलसीदासजींनी आमंत्रण नाकारले. सम्राट अकबराने सैनिक पाठवून तुलसीदासजींना बळजबरीने दरबारात बोलावून चमत्कार घडवून आणण्याचा आदेश दिला.तुलसीदासजी नम्रपणे म्हणाले मी कोणताही चमत्कार करत नाही, मी फक्त श्री रामजींचा भक्त आहे.त्यानंतर सम्राट अकबराने तुलसीदासजींना फतेहपूर सौक्री तुरुंगात डांबण्यात आले.त्यानंतर हनुमान चालीसा रचली आणि चाळीस दिवस त्याचे विधिवत पठण केले.पठण संपताच, माकडांचा एक मोठा समूह फतेहपूर सिक्रीवर उतरला आणि त्याने संपूर्ण शहरात हाहाकार माजवला. शहराचे रक्षक आणि मुघल सैनिक वानरसेनेचे शौर्य असहाय्यपणे पाहत राहिले. राजाला आपली चूक कळली. त्यांनी तुलसीदासजींच्या चरणांना स्पर्श करून त्यांची माफी मागितली आणि त्यांना सन्मानाने सोडले. गोस्वामीजी बाहेर येताच माकडांचा उपद्रव थांबला. तुलसीदासजींनी अकबराला फतेहपूर सिक्री सोडण्याचा सल्ला दिला. त्याच्या आदेशानुसार अकबराने पुन्हा दिल्लीला राजधानी केली.वरील घटना नुसती ऐकीव नाही तर ऐतिहासिक सत्य आहे. हनुमान चालिसाचे पठण आणि अनुष्ठान करणाऱ्या भक्ताचे श्री हनुमानजी नक्कीच रक्षण करतात हे या घटनेवरून स्पष्ट होते.
        रामायणात मारुती रायांनी भक्त (दास) म्हणून रामरायांची सेवा केली. वालीवध, लंकादहन, सेतुबंधन, हिमालयातून संजीवनी बुटी आणणे, कुंभकर्ण वध व इतर अनेक प्रसंगात मारुतीरायांनी श्रीरामांना सहकार्य केले आहे.
            महाभारतात भगवान श्रीकृष्ण सारथ्य करत असलेल्या व पार्थ अर्जुन असलेल्या रथाच्या छतावर भगवान मारुतीराया विराजमान झाले होते त्यामुळे महाभारतात पांडवांना यश मिळवणे शक्य झाले.

hanuman jayanti 2024  In Marathi |हनुमान जयंती माहिती मराठी


          मारुती हे सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत. पुराणग्रंथानुसार आजही ते हिमालयात तपश्चर्या करत आहेत. रामायण महाभारतात देवदानावांना झालेल्या गर्वाचे हरण मारुतीरायांनी केले आहे. यामध्ये भीम,पक्षीराज गरुड, सुदर्शन चक्र, यांचा समावेश होतो.
           समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र, मारुतीची आरती यांची रचना केली आहे. तुलसीदास रचित हनुमान चालीसा अखंड हिंदुस्तानात म्हटले जाते. 
           एकदा गोस्वामी तुलसीदास महाराजांना कोणीतरी सांगितले की जगन्नाथ पुरी मध्ये देव प्रत्यक्ष दिसतात ते ऐकून तुलसीदास महाराज अत्यंत कठीण खडतर प्रवास करत जगन्नाथ पुरीला गेले. तेथे मंदिरात जाऊन त्यांनी भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले. आणि ते निराश झाले त्यांना हात पाय नसलेली मूर्ती दिसली ते म्हणाले हा माझा देव नाही व निराश होऊन ते बाहेर पडले. बाहेर आपल्या शिष्यांसमवेत बसले असताना त्यांना एका लहान बालकांनी आवाज देऊन बोलवले व सांगितले भगवान जगन्नाथांनी तुम्हाला प्रसाद दिला आहे.तुलसीदासांनी तो प्रसाद घेतला नाही व परत केला व म्हणाले माझ्या आराध्य दैवताला अर्पण केल्याशिवाय  मी हा प्रसाद घेऊ शकत नाही आणि या मंदिरात मला माझ्या आराध्यांचे दर्शन झाले नाही त्यावर तो बालक म्हणाला तुमच्या रामचरितमानस या ग्रंथामध्ये माझे वर्णन तुम्ही "बिनू पद चालद सुनाद बिनू काना । कर बिनू कर्म कराड विधी नाना "। असे केले आहे. आता तुलसीदासजींचे भाव पाहण्यासारखे होते. डोळ्यात अश्रू होते. आणि तोंडातून शब्दच निघत नव्हते. तो  बालक गायब झाला. मी तुझा राम आहे. हनुमान माझ्या मंदिराच्या चार दरवाजांचे रक्षण करतो. तुलसीदासजीं महाराज सकाळी मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्याऐवजी श्री राम, लक्ष्मण आणि माता जानकीचे भव्य दर्शन झाले. ते स्थान 'तुलसी चौरा' या नावाने प्रसिद्ध झाले.

श्री राम मंदिर अयोध्या याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2024/04/jai-shree-ram-shri-ram-temple-ayodhya.html


|| जय श्री राम ||