jai shree ram | shri ram temple ayodhya | जय श्री राम | श्री राम मंदिर अयोध्या

                 

jai shree ram |  shri ram temple ayodhya | जय श्री राम | श्री राम मंदिर अयोध्या

               जय श्री राम | श्री राम मंदिर अयोध्या 

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा । पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ||

           चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी हा उत्सव यावर्षी दिनांक १७/०४/२०२४ रोजी आला आहे. या दिवशी राम जन्माचा सोहळा प्रत्येक जण मनोभावे व अत्यंत आनंदाने साजरा करतात. प्रत्येक व्यक्ती राम मंदिरात जाऊन अथवा घरातील, कार्यालयातील रामाच्या प्रतिमेसमोर उभे राहून जय श्री राम असे म्हणत राम जन्म सोहळा साजरा करतात.

              या दिवशी ठिकठिकाणी रामरक्षा स्तोत्राचे सामुदायिक पठण केले जाते. भगवान श्रीराम हिंदूंचे आराध्य दैवत आहेत. हिंदू पुराण धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामांचा जन्म सध्याच्या भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथे झाला होता. अनेक वादविवाद नंतर दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अभिजीत मुहूर्तावर अयोध्या नगरीत भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली.


श्रीक्षेत्र नरसोबावाडी दर्शन याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2023/12/temples-in-maharashtra.html


jai shree ram |  shri ram temple ayodhya | जय श्री राम | श्री राम मंदिर अयोध्या

      अयोध्येतील भगवान श्रीरामांचे मंदिर हे ३ मजल्याचे आहे. श्रीराम मंदिरात तळमजल्यावर असलेल्या मुख्य गर्भगृहात प्रभू श्रीरामांची नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. कृष्ण पाषाणापासून बनवलेली ही अप्रतिम अशी मूर्ती आहे. मनमोहक मूर्तीमध्ये पाच वर्षाच्या श्रीराम (बालकरुपी) अतिशय कौशल्यानी साकारण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट येथील व देशातील नामवंत कारागिरांमधून सर्वोत्कृष्ट कारागिरांची निवड करण्यात आली यामधून काशीचे शिल्पकार डॉक्टर श्री सुनीलजी विश्वकर्मा यांच्या रेखाटनुसार म्हैसूरचे शिल्पकार श्री अरुणजी योगीराज यांनी श्रीरामांची ही मूर्ती जिवंत स्वरूपात तयार केली आहे.


श्री आदिनारायण मंदिर परुळे, सूर्य मंदिर महाराष्ट्र याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.
https://www.kaujourneys.com/2024/02/shri-aadinarayan-temple-in-marathi.html


             प्रभू श्रीरामांची ही मूर्ती तीन अब्ज वर्ष जुन्या असलेल्या काळ्या माइनफॉर्म खडकात कोरलेली आहे. कर्नाटक राज्यातील मैसूर जवळील गुज्जेगौदनपुगी इथे विशेष प्रकारचे खाणकाम करून सोपस्टोन श्रेणीतील हा विशेष दगड मिळवण्यात यश आले आहे. या दगडावर हवामान व इतर द्रवयांचा कोणताही परिणाम होत नाही.

           प्रभू श्रीरामांची मूर्ती ही ५१ इंच उंच आणि ३६ इंच  रुंद असून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे अंदाजे वजन २००० किलो आहे, म्हणजेच २ टन आहे. प्रभू श्रीरामांची मूर्ती ही कमळामध्ये उभी असून प्रभू श्रीराम बाल्यरूपात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न अशी मुद्रा आहे. प्रभू श्रीराम स्मित हास्य करत आहेत. श्रीरामांच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. श्रीरामांच्या भोवती बांधलेल्या कमानीमध्ये सर्वात वरती सूर्य आहे. त्यांच्या शेजारी शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, प्रणव अशी शुभचिन्हे आहेत. श्रीरामांच्या बाजूला कमानीमध्ये दशावतार आहेत. श्रीरामांच्या मूर्तीच्या खाली उजव्या बाजूला भगवान श्रीहनुमान जी विराजमान आहेत.  बाजूस गरुड देव यांची सुंदर मूर्ती कोरलेली आहे.


jai shree ram |  shri ram temple ayodhya | जय श्री राम | श्री राम मंदिर अयोध्या


                    प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित रामायण हे महाकाव्य प्रचलित आहे प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असे म्हटले जाते. 


श्री गरुडेश्वर दत्त मंदिर याबद्दल आपण येथे माहिती वाचू शकता.  
https://www.kaujourneys.com/2023/12/blog-post_11.html


रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ||

श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम ॥ श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम || 

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ॥ श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि, श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ||                  

                                                                || जय श्रीराम ||